
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार राहूल गांधी यांना गुजरात राज्यातील न्यायालयाने दाेन वर्ष शिक्षा ठाेठावली असून त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निकालामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून केंद्रातील माेदी सरकारच्या निषेधार्थ घाेषणाबजी करीत निदर्शने करण्यात आली.
राहूल गांधी यांना शिक्षा सुनावली, ते कारण ग्राह्य मानले तर दर भारतीय राजकरणात प्रत्येक क्षणाला एकमेकांचा उद्धार करणारे राजकीय नेते आणि त्यांना वेगवेगळ्या उपाध्या देऊन त्यांना बाेलणारी सर्वच जनतेला कारागृहात जावे लागेल, अश्या शब्दात काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या देशात लोकशाहीचा गळा घाेटण्याचा काम केंद्रातील मोदी सरकार करत आहे.
एकमेव राहुल गांधी असे नेते आहेत की त्यांनी मोदी सरकार विरोधात आवाज उठवत आहे. भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केली त्याला घाबरून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे, याचा विरोध करण्यासठी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निदर्शने करण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर,कार्याध्यक्ष तानाजी भोंग,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस काकासाहेब देवकर, तालुका उपाध्यक्ष निवास शेळके,युवक तालुकाध्यक्ष मिलिंद साबळे, बिभीषण लोखंडे,जाकीरभाई काझी,चमनभाई बागवान, डॉ.संतोष होगले, युवराज गायकवाड,नासीरभाई शेख, शिवाजी आहेर,सुफीयान जमादार, बापूसाहेब व्यवहारे, दत्तात्रय देवकर आदी काॅंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.