
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
जैव-विविधतेने वृद्धिंगत होण्यासाठी तालुका मियावाकी वन मिशन – विनोद खेडकर गटविकास अधिकारी
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :– गतवर्षी पावसाळ्यात नगरपरिषद,लोकजागर संघटना तसेच अंजनगाव सुर्जी शहर आणि ग्रामीण सामाजिक संघटना मिळून मियावाकी जंगल पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला.नागरिकांच्या सहकार्याने अंजनगाव सुर्जी येथील बोराळा रोडवरील मियावाकी प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे आता संपूर्ण तालुका मियावाकी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन लोकजागर संघटनेच्या वतीने अंजनगाव सुर्जी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांच्या मार्गदर्शनात बैठक संपन्न झाली.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावा-गावात मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड संदर्भात या अनुकरणीय उपक्रमाचे स्वागत करत गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी हिरवी झंडी दिली आणि प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाने तसा ठराव घ्यावा असे आदेश बैठकीला उपस्थित ग्रामसेवकांना देण्यात आले.बुलढाणा,अकोला,यवतमाळ,वाशिम सोबतच अमरावती जिल्ह्यात ठिक-ठिकाणी शासनाच्या विविध यंत्रणामार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू आहे.सामाजिक संस्था,वृक्षप्रेमी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत असून आता अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रत्येक गावच्या ई-क्लास जमिनीवर शासनाच्या परिपत्रकानुसार मियावाकी पद्धतीने वृक्षलागवडीवर भर दिला जात आहे.
यावेळी गटविकास अधिकारी विनोद खेडकर,ग्राहक पंचायत जिल्हा सचिव तथा लोकजागर संघटना समन्वयक आनंद दादा संगई,डॉ.कौस्तुभ पाटील (एम.डी),एन.एम,भारसाकळे,कु.वैशाली कोठवार,विजय कथलकर,व्ही.आर.वडतकर,अजय झाडे,गजानन बेलसरे,सुधीर यावुल आदी ग्रामविकास अधिकारी तसेच प्रवीण गिऱ्हे,ए.आर.बहादुरे,एस.यु.मोहोड,प्रवीण साखरे,राजेश उगले,योगेश्वर उमक,कु.वैशाली गांजरे,सी.एच.आजनकर,मंगला साळुंके,प्रमोद धोत्रे,सतीश गवई,एस.व्ही.बादशे,प्रवीण बंड,विनोद वाठोडकर,भरत निस्ताने,वैशाली चव्हाण,साहेबराव वानखडे,आर.व्ही.सराड,जगदीश गावंडे,विजय माने,पंकज कळसकर,कु.मनीषा चव्हाण,मुनिब अहमद खा इत्यादी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामसेवक आणि लोकजागर संघटनेचे सदस्य देवानंद महल्ले व संजय धारस्कर यावेळी उपस्थित होते.
—————————————-
स्थानिक झाड लावण्याच्या अनेक पद्धती आहेत.बहुसंख्य पद्धतीत झाड वाढवायला २५ ते ३० वर्षे लागतात.सध्याच्या काळात हजारो आजारांनी नागरिकांना वेढलेले आहे आणि अश्यातच रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन कमी भासत आहे आणि लाखो रुपये देऊन सुद्धा रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नाही.याकरिता प्रत्येक नागरिकांना सुलभ,नैसर्गिक वातावरण मिळणे आवश्यक असून यासंबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे आणि प्रत्यक्षात अनुभवायचे झाले तर मियावाकी जंगल प्रकल्पाचे उत्तम उदाहरण म्हणजे गणपती नगर व चिंतामणी नगर येथे बघायला मिळेल.या मियावाकी जंगल प्रकल्पाला आपण अवश्य भेट द्यावी आणि अनुकरण करून अभ्यास करावा.
– डॉ.कौस्तुभ पाटील
—————————————-
प्रत्येक गाव झाडांच्या सौंदर्याने भरलेले असावे,प्रत्येक गावातील वातावरण प्रदूषणमुक्त राहावे,यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकजागर संघटनेच्या सदस्यांनी यंदा जपानच्या मियावाकी पद्धतीने घनदाट वृक्ष लागवडीवर भर दिला आहे.मियावाकी ही मानवनिर्मित जंगल पद्धती असून यामध्ये परिसंस्था अभियांत्रिकी द्वारे कमी जागेत अधिक वृक्ष या पद्धतीत देशी वृक्षांची लागवड केली जाते.ही निसर्ग आणि विज्ञानाची मैत्री आहे.त्या अनुषंगाने प्रत्येक शासकीय कार्यालयामार्फत संपूर्ण सजीव प्रजातीला सुआरोग्यास पूरक वातावरण तयार होवू शकेल याकरिता प्रयत्न करावा.
– आनंद दादा संगई