
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन नवरंग युवक क्रीडा मंडळद्वारे दिनांक २४ मार्च पासून सुरू करण्यात आले आहे.आज स्पर्धेचा दुसरा दिवस होता.दुसऱ्या दिवसाच्या कबड्डी सामन्यात मराठा फ्रेंड्स क्लब अमरावती विरुद्ध छत्रपती क्रीडा मंडळ अमरावती असा उत्कृष्ट सामना झाला.यामध्ये कबड्डी सामन्यात अंतिम क्षणापर्यंत फारच चुरशीची लढत पाहायला मिळाली.तर या कबड्डी सामन्यात अंतिम क्षणात मराठा फ्रेंड्स क्रीडा मंडळाने ११ गुण मिळवून विजय मिळवला.