
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या आजच्या लोहा सभेसाठी प्रचंड गर्दी जमणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातून सुध्दा सुमारे दहा हजार नागरिक या सभेसाठी येणार असल्याचा दावा भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
ऊद्या म्हणजेच रविवार, दि. २६ रोजी रोहा येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या अनुषंगाने आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पुढे असेही सांगितले आहे की, भारत राष्ट्र समिती या पक्षाचे तेलंगणा मॉडेल हे केवळ महाराष्ट्र राज्यच नाही तर संपूर्ण देशात राबविले जाणार आहे. त्याचीच तयारी म्हणून महाराष्ट्र व आसाम या दोन्ही राज्यांत तालुका व जिल्हा निहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून देशभरातील उर्वरित राज्यांमध्ये लवकरच बांधणी केली जाणार असून तेलंगणा मॉडेल देशभर राबविला जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी लोहा येथील सभेस लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहातील असा दावा करत त्यांनी शेजारील सर्व जिल्ह्यांतील नागरिकांना सभेस उपस्थित राहाण्याचे आवाहन केले गेले आहे.