
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : अल निनो सारख्या परिस्थितीवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल निनो या समुद्री प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
त्यामुळे जून 2023 नंतरही पिण्यासाठी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान यावरच बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आपल्याकडे मेट्रोलॉजिकल विभागाचा अंतिम अहवाल 21 एप्रिल नंतर येतो. तो आल्यावर त्यानुसार पावले उचलली जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
हे वर्ष (2023) ‘अल निनो’चे असू शकते, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तर हवामानतज्ज्ञांचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. तर अनेक भागाला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान यावर बोलताना फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना, ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करण्यात आली असल्याचं म्हटले आहे. तसेच अल निनो सारख्या परिस्थितीवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. मेट्रोलॉजिकल विभागाचा अंतिम अहवाल 21 एप्रिल नंतर येणार असून, तो आल्यावर त्यानुसार पावले उचलली जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.