दैनिक चालू वार्ता भूम प्रतिनिधी –
भु म:-सिमरन अब्बास सय्यद हिने आपल्या जीवणातील पहिला उपवास (रोजा ) ठेवला . सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी ५.१४ वाजेपासून ते सायंकाळी ६.५६ पर्यंत रोजाच्या नियमानुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटी राहून अल्लाह प्रति श्रद्धा व्यक्त केली . तसेच या चिमुकल्याने पहिला रोजा ठेवल्याबद्दल तिचे आई , वडील , आजोबा , चुलते, चुलती, मामा, मामी आजी यांच्या सह सर्वत्र कौतुक होत आहे .
