
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून याप्रसंगी MPSP ने STARS SCHOOL अंतर्गत शाळेची निवड झाली आणि शाळेला 10 Tablets उपलब्ध करून दिले त्याचे आज मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या वेळी
वसंत हरबक अध्यक्ष शालेय व्यवस्थापन शंकर नाईक उपाध्यक्ष शा.व्य.समिती, जनार्धन दवणे, दीपक दवणे सदस्य योगेश्वर नाईक, अशोक रणवीर, अंगणवाडी सेविका , मुख्याध्यापक चरकेवाड एस एन, श्री भुस्कुटे डी डी सी.शि. इत्यादीसह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.