
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.16 कासारी (ता. शिरूर) गावच्या हद्दीमध्ये तळेगाव ढमढेरे गावच्या यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलाचे शिंग छातीत घुसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. विशाल बाळासाहेब राऊत असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कासारी व तळेगाव ढमढेरे गावच्या सीमेवर असलेल्या बैलगाडा घाट या ठिकाणी तळेगाव ढमढेरे व कासारी गावातील बैलगाडा शर्यतीचे केले जाते. आज या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले असताना विशाल राऊत हा देखील त्याच्या कुटुंबीयांसह बैलगाडा शर्यतीसाठी आला होता. यावेळी बैलांनी केलेल्या हालचालीदरम्यान बैलाचे शिंग हे विशाल याच्या छातीत घुसले. बैलाचे शिंग हे विशालच्या छातीत खोलवर घुसल्याने गंभीर दुखापत होऊन विशालचा जागीच मृत्यू झाला. याबाबत योगेश अरुण राऊत यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.