
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा दवणे
मंठा तालुक्यातील माळेगाव येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शुक्रवार दि. १४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीच्या निमित्ताने तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते इंजि. माधवभाऊ चव्हाण आवर्जून उपस्थित राहत समाजबांधवांच्या आनंदात सहभागी झाले.
यावेळी समाजबांधवांना संबोधित करताना इंजि. माधवभाऊ चव्हाण म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेले भारतीय संविधान आज जगभरात आदर्श संविधान म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे, ह्या संविधानाने जगातील सर्वात मोठी व आदर्शवत अशी लोकशाही अस्तित्वात आली. सर्व समाजघटकांना समान अधिकार दिला. बाबासाहेबांमुळे लाखो घरांचा उद्धार झाला, असंख्य दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला.
तत्पूर्वी इंजि. माधवभाऊ चव्हाण यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संपूर्ण विश्वाला शांतीचा, समतेचा आणि बंधुतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना मानवंदना दिली. यावेळी परिसरातील उपस्थित समाजबांधवांच्या वतीने माधवभाऊ यांचा सत्कार करण्यात आला. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘जय भीम’च्या नाऱ्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमाला गोरखनाथ राठोड ,सेवकराम राठोड ,पंढरीनाथ चव्हाण ,गजानन चव्हाण ,भगवान चव्हाण ,करण राठोड ,स्वप्नील राठोड ,विजय राठोड परिसरातील समाजबांधव, महिला, तरुण व अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.