
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
पुणे :दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक माननीय श्री अरविंद केजरीवाल यांना आज CBI ने सकाळी 11 वाजता चौकशीसाठी येण्याचे समन्स पाठवले आहे. आम आदमी पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे अरविंद केजरीवाल यांच्या सोबत आहेत.
आज दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी पुतळा, पुणे स्टेशन येथे काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला आहे.
दिवसभर काळ्या फिती दंडावर बांधून आपली दिनचर्या केली .
अन्यायच्या विरोधात सत्याच्या मार्गाने काम करणारी पार्टी म्हणून आम आदमी पार्टीला ओळखले जाते आणि म्हणूनच सत्ताधारी पक्षांनी अडचणीत आणण्यासाठी व कूहेतूने माननीय अरविंदजी केजरीवाल यांच्यावर सीबीआय चौकशीसाठी समन्स काढला आहे आहे.
आणि त्या विरोधात आम आदमी पार्टीने पुणे येथे निषेध व्यक्त केला आहे यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते