
दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले.
लातुर/अहमदपुर: तालुक्यातील सुमठाणा येथे उपजिल्हाधिकारी ॲड.विलास बळीराम नरवटे नागरी सुमठाणा गावातील सर्व गावकर्यान्च्च्या वतीने हनुमान मंदिर सुमठाणा येथे नागरी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रस्ताविक करत असताना संग्राम मुसळे सर यांनी सत्कार मूर्ती विलास नरवटे यांच्या यशाच कौतुक केले तसेच गावातील युवकांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली आणी गावचा भाचा उपजिल्हाधिकारी झाला याचा गावाला अभिमान असल्याचे संग्राम मुसळे म्हणाले.विलास नरवटे यांच्या बरोबरच त्यांच्या आई वडील,भाऊ यांचा सत्कार गणेश भाऊसाहेब पोले, गंगाराम पोले,बळीराम पोले,चंद्रहास हमने,गुणवंत मुसळे,सिद्राम मुसळे,बालासाहेब मुसळे,भगवान पोले,विश्वनाथ पोले,दिगंबर पोले,शिवराज पोले, वैजियन्ता पोले , जिजाबाई पोले, कुलकर्णी देवबाप्पा, यांच्या हस्ते करण्यात आला.राम नरवटे नरवटवाडीकर यांनी आपल मनोगत व्यक्त करताना विलास नरवटे यांच्या संघर्षा बद्दल सांगितले.आपल्या सत्काराला उत्तर देत असताना आपल मनोगत व्यक्त करताना विलास यांनी आपल्या आजोळातील आपल्या बालपणीच्या आठवणीना उजाळा दिला तसेच आपल्या आजी आणी मामा शिवाजी पोले हा आनंदी सोहळा बघायला हवे होते म्हणत भावनिक झाले.या गावातील माणिक मुसळे या व्यक्तीच्या हुशारीने प्रभावित होऊन त्याच्या सारखा हुशार बनण्याचा प्रयत्न लहानपणी केला अस ते म्हणाले.युवकांनी आपण जो पर्यंत यशस्वी होत नाही तो पर्यंत प्रयत्न करण्याची तयारी ठेवावी आणी आपल्या आई वडिलांना अभिमान वाटावा असे कार्य करण्याचे आवाहन केले.यश मिळवायचे असेल तर मेहनती शिवाय पर्याय नाही मेहनत करण्याची तयारी विध्यर्थ्यांनी करावी ,त्यांनी आपल्या भाषणात आपले अभ्यसा बद्दल चे नियोजन आणी अनेक किस्से सांगत युवकांना मार्गदर्शन केले.आणी सुमठाणा गावातील सर्वच गावकरी माझे मामा आहेत त्यांनी माला दिलेले आशीर्वाद आणी कौतुक रुपी सत्कार याने मी पूर्णतः भारावून गेलो आहे म्हणत सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक संग्राम मुसळे यांनी केले ,सूत्रसंचालन नंदराज पोले यांनी केले तर आभार चेअरमन दिगंबर पोले यांनी मांडले.या कार्यक्रमासाठी गावातील सर्वच गावकरी,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.