
दैनिक चालू वार्ता नांदेड जिल्हा प्रतिनिधी -विश्वास खांडेकर
सिडको येथील इंग्लिश विषयाचे प्रसिद्ध प्राध्यापक “मधुकर गायकवाड” यांनी व त्यांच्या भावांनी वडिलांच्या मरणोत्तर एक सुंदर मंदिर बनून वडिलांच्या उपकाराची जाण ठेवली आहे.
हर्षद पाटीपासून येवला पिंपळगाव या ठिकाणी, घरातच वडिलांचे एक सुंदर मंदिर बांधले आहे आणि त्या ठिकाणी वडिलांची मूर्ती बसवून दरवर्षी त्यांच्या स्मरणार येथे किर्तन महोत्सव ते साजरा करतात. यावर्षी वडिलांचे दुसरे पूण्यस्मरण असून, या दुसऱ्या पुण्यस्मरणाच्या वेळी त्यांनी वडीलांची मूर्ती साकारली आहे. आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन देखील केले आहे. तसेच गावातील लोकांसाठी भंडारा आयोजित केलेला आहे .
या ठिकाणी मधुकर गायकवाड यांचे वडील वामनराव जयरामजी गायकवाड हे एक पुण्यवंत आत्मा होते. त्यांनी आयुष्यभर पंढरीची वारी, पोथी, पुराण यांचे पठण करण्यातच घालवले. वामन रावांना त्यांच्या गावातील लोक महाराज म्हणूनच ओळखतात. अशा पुण्यवंत आत्म्याचे चार मुले, या चार मुलांनी मिळून वडिलांचे एक सुंदर मंदिर घरातच उभारले आणि त्या ठिकाणी यावर्षी मूर्तीची स्थापना केली. या वामनरावाचे “विठ्ठल गायकवाड” म्हणून एक मुलगा आहेत. ते देखील वंचित बहुजन आघाडी मध्ये पदस्त आहेत त्यामुळे अनेक राजकीय पक्ष, विद्यमान आमदार, माजी आमदार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. कार्यक्रम अगदी भव्य दिव्य असा साकारण्यात आला आहे आणि प्रत्येक मुलांनी आदर्श घ्यावा अशी ही संकल्पना या चार बंधूंनी समाजापुढे मांडली आहे. तरी देखील पंचक्रोशीतल्या लोकांनी या मंदिरात भेट घेऊन एक आदर्शाचा साक्षात्कार करून घ्यावा असे गावकरी सांगत आहेत.