
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
दुर्गापूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भोंगळ कारभार या मुद्द्याला धरून १८एप्रील पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आल्यानंतर उपोषणकर्त्यांना गावकऱ्यांकडुन मिळालेल्या सहानुभूतीपुर्वक समर्थनाची दखल घेऊन सरपंच , ग्रामविकास अधिकारी व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी आज प्रत्यक्ष उपोषण मंडपात येऊन , मागण्या पुर्ण करण्यासंबंधी चे लेखी पत्र उपोषणकर्ते व समता संघर्ष फाॅंऊन्डेशचे जिल्हा अध्यक्ष सुनिलदादा पाटील यांना सुपुर्द केले. तसेच चर्चेअंती सर्वश्री सुनिलदादा पाटील,सुरज रामटेके,पौलस रत्ने,विनीत तावाडे,अमर गोलेटकर या उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजुन त्यांचे उपोषण सोडवण्यात आले.