दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड जिल्ह्यात शिवसेनेची मुहुर्तमेढ रोवणारे पाहिले जिल्हाप्रमुख माजी आ. रोहिदास चव्हाण यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खारीक खोबऱ्याचा हार घालून त्यांनी सत्कार केला. यावेळी दोन्ही नेत्यांत मतदारसंघ व जिल्ह्याच्या राजकारणा विषयी चर्चा झाली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) लातूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून माजी आ. रोहिदास चव्हाण यांची निवड पक्षांच्या वतीने करण्यात आली त्या पार्श्वभूमीवर माजी आ. रोहिदासस चव्हाण हे मुंबई येथे मातोश्री वर गेले असता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचा लोह्याच्या पारंपारिक पद्धतीने खोबऱ्याचा हार घालून सत्कार केला.
यावेळी नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, व्यंकटेश वाघमारे, मोहन वाघमारे सह आदींची उपस्थिती होती.
