
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.21 पुणे- नगर महामार्गालगत वाघोली परिसरातील सात अनधिकृत मोठ्या फ्लेक्स होर्डिंगवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये ५४०० स्क्वेअर फुट होर्डिंग निष्कासित करण्यात आले असल्याची माहिती वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नामदेव बजबळकर यांनी दिली. अतिक्रमण आकाश चिन्ह विभाग उपायुक्त माधव जगताप, परिमंडळ १ च्या उपायुक्त किशोरी शिंदे यांच्या आदेशानुसार व नियंत्रणाखाली, महापालिका सहाय्यक आयुक्त नामदेव बजबळकर यांच्या पथकाने सदरची कारवाई केली. यापुढेही ही अशीच कारवाई दैनंदिन करणार असल्याचे बजबळकर यांनी सांगितले.