
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर शहरात दिनांक22 एप्रिल 2023रोज शनिवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांची 918 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
22 एप्रिल 2023 रोजी सकाळी आठ वाजता षठस्थल भगवा ध्वजारोहण
देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते करण्यात आले .व
माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या हस्ते बसवेश्वर च्या प्रतिमेची आरती करून फटाक्यांची आतिषबाजी करून बसवेश्वरांच्या जयघोष यामध्ये जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिसेटवार, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोहम माछरे व
देगलूर नगरीतील सर्व नगरसेवक,सर्व पक्षीचे कार्यकर्ते , डॉक्टर,व्यापारी, शिक्षक, जेष्ठ नागरिक तसेच प्रशांत पाटील आचेगावकर व सतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व महात्मा बसवेश्वर उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महात्मा बसवेश्वर जयंती च्या शुभेच्छा देण्यात आले