दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -स्वरूप गिरमकर
वाघोली ता.23 खराडी येथील पंचतारांकित सोसायटी मारवल झायपर सोसायटी तर्फे आज माझी दैनिक चालू वार्ताच्या प्रतिनिधी वाघोली तसेच माहिती अधिकार संघाच्या शिरूर तालुका प्रचार प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आर्यन सात्रस,दिगंबर खुणे, अनिकेत भोईटे, सुभाष पवार, परीक्षित नायक, संतोष चव्हाण, सुचित्रा नायक,सर्व सोसायटी सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
चेअरमन श्री सुनिल दादा सात्रस यांनी या वेळेस सर्वाना ओळख करून देताना माझ्या गावातील एक सहकारी आज पत्रकार म्हणून काम करत आहे याचा नक्कीच आमच्या गावासाठी खुप मोठा अभिमान आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून नक्कीच ते जनतेच्या भल्यासाठी सडेतोड भूमिका मांडतील. तळागाळातील प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोचवतील याची आम्हाला खात्री आहे. प्रसिद्ध उद्योजक श्री सायरस सर यांनीही शुभेच्छा देताना सांगितले की सामान्य जनतेच्या कामासाठी आपण सदैव तत्पर राहा आपणास नक्कीच अजुन पुढे जाण्याची संधी मिळेल. सत्याची साथ कधी सोडू नका.
पत्रकारितेच्या माध्यमातून सडेतोड भूमिका मांडा असे आवाहन मा. उपसरपंच श्री शशिकांत कोकडे यांनी केले.
या वेळी दैनिक चालू वार्ताचे प्रतिनिधी श्री स्वरूप गिरमकर यांनी आभार मानताना सांगितले की आपल्या या सत्काराने खरंच भारावून गेलो. चेअरमन श्री सुनिलदादा सात्रस यांचा मला कायम भक्कम पाठिंबा राहिला आहे त्यांचं युवा वर्गाला चांगल्या कामासाठी सतत प्रोत्साहन असते. मी आपणास विश्वास देतो की मी गोरगरीब जनतेचे प्रश्न लेखणीच्या माध्यमातून सोडविण्याचा कायम प्रयत्न करीत राहिलं असे आश्वासन देतो. व माझा हा अभूतपूर्व सत्कार केल्याबद्दल मारवल झायपर सोसायटीच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो.
