
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर: इंदापूर मध्ये महाआघाडीत बिघाडी झाल्याने राष्ट्रीय काँग्रेस ने एकला चलो रे ची भूमिका घेतल्याने आता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे.
यावेळी तानाजी भोंग यांनी सांगितले की,कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमचे मार्गदर्शक आमदार संग्रामदादा थोपटे, जिल्हाध्यक्ष संजयजी जगताप यांच्या आदेशानुसार, इंदापूर तालुका अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर मार्केट कमिटीच्या निवडणूक निमित्ताने इंदापूर काॅंग्रेस पुरस्कृत ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रतिनिधी गटाचे उमेदवार तानाजी भोंग हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाला संधी दिलेली आहे.तानाजी भोंग यांच्या मते शेतकऱ्यांच्या संस्थेत लहान शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आमच्यासारख्यांना संधी देण्यात यावी. धनदांडग्या, प्रस्थापितांच्या, स्वार्थासाठी रात्रीत सर्वपक्षीय एकत्र आलेली लोक तालुक्यातील जनतेने पाहिलेल आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढवणार नाही हे अगोदरच जाहीर केलेल आहे , का ते गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक संदर्भात अजुन कोणतीही अधिकृत भुमिका जाहीर केली नाही, त्यामुळे कार्यकर्ते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. यात आमची कॉंग्रेसची भुमिका स्पष्ट आहे. शेतकऱ्यांच्या संस्थेत प्रतिनिधित्वासाठी आमदारच पाहिजेत का? तेही दुसऱ्या जिल्ह्यातुन निवडुन आलेले , इंदापूर तालुक्यात अनुसूचित जाती जमातीतील प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र व्यक्ती नाहीत का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
काॅंग्रेस पक्षाकडून सहकार महर्षी शंकरराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रचारास सुरुवात करण्यात आली.इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी मला संधी द्यावी, तालुक्यातील जनता सुज्ञ व जागृत आहे विचारपुर्वक मतदान करतील,तालुक्यातील सुज्ञ ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांनी माझ्या शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून आपले एक बहुमूल्य मत देऊन मला निवडून द्यावे असे आवाहन काॅंग्रेसचे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उमेदवार तानाजी भोंग यांनी केले आहे.