दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही आळविती , सुस्वरे” संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून वृक्षांचे महत्व आणि त्यांचा मानवाच्या जिवनाशी असलेला गाढ संबंधातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू आता आधुनिकीकरणाच्या वेडाने पछाडलेल्या मानवाला त्याचा दिवसेंदिवस विसर पडत चालला आहे. मार्केटिंगच्या जगात वस्तुची जाहिरात मोठी तर तिचा खपही मोठा, असे समीकरण आहे.
जाहिरातीसाठी पोस्टरबाजी क रायची तर त्यासाठी मोकळी जागा नाही, मग झाड आहे की, बॅनर लावायचेय, बघ एखादा डेरेदार वृक्ष. ठोका झाडावर खिळे, अशा मुक्या झाडावर फुकटच्या जाहिरातीबाजीमुळे असंख्य खिळेठोकलेले वृक्ष जणू वेदनेने विव्हळत आहेत. यावर आळा घालून अशा कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे. अनेक ठिकाणी चौकाचौकात अशा जाहिरातींचा खर्च दिसतो. जाहिरात करण्यासाठी जागा नसल्याने प्रसंगी झाडांचा वा- पर केला जातो. बॅनर-पोस्टर घट्ट बसावा, यासाठी चारही बाजुंनी खिळे ठोकले जातात. काही महाभाग तर पत्र्यावर जाहिरात करून पत्राच झाडाला ठोकतात. झाडावर ठोकलेले खिळे कालांत- राने गंजतात. तो गंज वृक्षाच्या बुंध्यात उतरतो परिणामी वृक्ष कालांतराने खंगत जाते. शहर परिसरातील झाडांवरील फ्लेक्स बोर्डमुळे झाडांना मरणयातना सहन कराव्या लागत आहे.
