दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
अल्पावधीतच लोहा शहरात नावा रुपाला आलेल्या भाग्यवंती महिला बॅकेस नांदेड जिल्हाचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सदिच्छा भेट दिली व बॅकेच्या कार्याची प्रशंशा केली.
लोहा शहरात मागील काही महिन्यापुर्वी माजी नगरसेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. शोभाताई बगडे यांनी महिलांच्या प्रगतीसाठी काही महिलांना सोबत घेवून भाग्यवंती महिला बॅकेची स्थापना केली.आज बॅकेत महिला बचत गटांचे व महिलांचे खाते मोठया प्रमाणात उघडन्यात आले असुन बॅकेच्या बचतीचा आलेख दिवसेंनदिवस वाढत आहे.यामुळे बॅकेचा महिलांना व महिला बचट गटांना मोठया प्रमानात फायदा होत आहे. आज दिनांक २५ एप्रिल रोजी दुपारी नांदेड जिल्हाचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बॅकेस भेट दिली असता बॅकेचे संचालक तथा माजी प्राचार्य बगडे सर व बॅंकेच्या संचालिका तथा माजी नगरसेविका सौ.शोभाताई बगडे यांनी खासदार यांचे हार , शाल व भाग्यवंती देवीची प्रतिमा देवून स्वागत केले यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, शिवसेनेचे तालुका प्रमुख मिलिंद पाटील पवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, भाजपा गटनेते करीमभाई शेख, भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे, भाजपा तालुका सचिव तथा तंटामुक्ती अध्यक्ष माधव पाटील पवार, दिपक पाटील कानवटे, भाजपा युवा शहराध्यक्ष अवि पाटील पवार, सचिन मुकदम, भानुदास पवार, अनिल धुतमल, बाळू पाटील पवार, मारोती पाटील बोरगांवकर, भारत पाटील कदम , पोलिस निरीक्षक संतोष तांबे आदीची उपस्थीती होती.
