दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
तालुक्यातील बेरळी (खु) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त संबोधी बुद्ध विहार येथे निःशुल्क बेरळीचे भुमिपुञ अरविंद रायबोले व गावकऱ्यांच्या माध्येमातुन अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.
बेरळीचे भूमिपुत्र अरविंद रायबोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या संकल्पनेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तरुण पिढी पर्यंत पोहचविण्यासाठी ग्रंथालय व अभ्यासिकेच्या माध्यमातून विचाराची चळवळ सुरु करण्यात आली आहे.
२५ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे
लोकसहभागातून संबोधी बुद्ध विहार येथे अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन अरविंद रायबोले यांच्या हस्ते करण्यात आले. या अभ्यासिकेची व्यवस्था निःशुल्क आहे. तरुणांना सरळसेवा MPSC UPSC या परीक्षांचे संदर्भाचे पुस्तके या ग्रंथालयात ठेवण्यात आले आहेत. या अभ्यासिका ग्रंथालयास जि.प.प्राथमिक शाळेतील शिक्षक आर.जी.वाघमारे यांनी पुस्तके भेट दिली. ‘ बुद्ध विहार हे धम्मा सोबतच शिक्षणाचे केंद्र व्हावे व येथून अनेक जण उच्च पदावर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कृतीत उतरवावे आसा या आभ्यासिकेत संकल्प केला. या प्रसंगी अरविंद रायबोले यांनी विचार मांडले.
या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध -हदय विकार तज्ञ डॉ मिलिंद धनसडे, जयंती मंडळाचे अध्यक्ष देवानंद रायबोले, नामदेव बुद्धे, सरपंच पपु नाईक , मुख्याध्यापक मंगल सोनकांबळे, सहशिक्षक विशाल महाबळे, सैनिक प्रसेनजित कांबळे , शंकर गायकवाड, गोविंद बुद्धे, ज्ञानोबा रायबोले, कपिल रायबोले, जळबा कांबळे, कृष्णा कांबळे , राम कांबळे ,उत्तम गायकवाड , माधव डोंगरे, आनंदा डोंगरे, भास्कर कदम इत्यादी नागरिक उपस्थित होते. गावातील सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घ्यावा असे आवाहन जयंती मंडळाकडून करण्यात आले आहे.
