दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर हे रमजान ईद निमित्ताने दरवर्षी गटनेते नगरसेवक करीम शेख यांच्या निवासस्थानी भेट देतात त्यांना ईदच्या शुभेच्छा देत असतात यंदाही जुन्या लोह्यातील गोरोबाकाका मंदिर लगत असलेल्या करीमभाई यांच्या निवासस्थानी भेट दिली व सुरकुर्मा चा स्वाद घेत मुस्लिम कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या
विश्वासू व निष्ठावंत असलेले नगरसेवक व गटनेते करीम शेख यांच्या जुन्या लोह्यातील निवासस्थानी खा चिखलीकरांनी भेट दिली व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी करीम शेख त्याचे बंधू सलीम शेख, गैस पटेल अजमत शेख यांनी त्यांचा सत्कार केला सुरकुरमा घेतला व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदन, उपनगराध्यक्ष दता वाले, नगरसेवक भास्कर पाटील, माजी नगरसेवक अप्पाराव पवार, नामदेव पाटील पवार, अनिल धुतमल, सचिन मुकदम, मर्चंट बँकेचे संचालक हरिहर धुतमल,सर यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर लोहा शहरातील प्रसिद्ध हॉटेल वेलकम चे मालक युनूस शेख यांच्या वडीलाचे निधन झाले असल्याने त्यांच्या शिवकल्याण नगर येथे निवासस्थानी भेट देऊन सात्वन केले व आसिफ किराणा दुकानदार यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली त्यांनी खा चिखलीकरांचा सत्कार केला तसेच निष्ठावंत कार्यकर्ता सरवरभाई यांनीही प्रतापरावांचा सत्कार केला ईदच्या शुभेच्छा दिल्या.
