
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी –
उस्माननगर येथून जवळच असलेल्या पोखरभोसी ता लोहा येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव , भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी पंचशिल नवयुवक भिमजयंती मंडळ व गावक-यांच्या वतीने पोखरभोसी येथे दि.२९ एप्रिल २०२३ रोज शनिवार ह्या दिवशी भिमजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजीमहाराज, महत्मा फुले, छत्रपती शाहूमहाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी ठीक ९ .३५ वाजता पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन मा.श्री शिवाभाऊ नरंगले (वंचित बहुजन आघाडी दक्षिण जिल्हाध्यक्ष नांदेड )यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून मा.थोरात साहेब (उपविपोअ कंधार ) मा.संतोष तांबे साहेब ( पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लोहा ),मा.सतिश अण्णाराव पिटील( वंचित बहुजन आघाडी लोहा तालुका अध्यक्ष ),मा.संजय भालेराव ( जिल्हा सरचिटणीस आर.पी.आय.नांदेड),पंचशिल कांबळे ( नगरसेवक ,गटनेता नगरपरिषद लोहा ), मा.सुभाष कोल्हे ( जिल्हाध्यक्ष ,संभाजी ब्रिगेड नांदेड ) हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीत गावातील सरपंच, उपसरपंच, संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य, पोलीसपाटील, तंटामुक्त अध्यक्ष, सेवा सरकारी सोसायटी चे चेअरमण, व्हाईस चेअरमन, सोसायटी सभासद ,जि.शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, प्रा.आरोग्य उपकेंद्र पोखरभोसी परिचरीका सौ.गिते मॅडम , शालेय समिती अध्यक्ष व सर्व सदस्य , अंगणवाडीतील सेविकाव मदतनिस यांची उपस्थिती लाभणार आहे.यानंतर दुपारी ठिक ३.०० वाजता विश्वभुषण, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्यांनी काढण्यात येणार आहे. मिरवणूक विसर्जन झाल्यानंतर रात्री ठिक ८ .०० वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर बापराव जमदाडे ( गित मोह कलामंच शिराढोण ) व दिक्षा गोमस्कर ( गायीका ) यांचा बुद्ध ,भिमगिताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी पंचक्रोशीतील भिम सैनिक, भिम अनुयायी , बौद्ध उपासक ,उपासीका गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन भिमजयंती मंडळाचे अध्यक्ष – एकनाथ लक्ष्मण कांबळे ,उपाध्यक्ष -प्रकाश ग्यानोबा वाघमारे,सचिव – गोविंद व्यंकटी भावे व जयंती मंडळाचे कार्यकारणी यांनी व सर्व गावकरी मंडळींनी आवाहान केले आहे.