
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
महाराष्ट्र राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व उच्च विद्याविभूषित पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार हे भारतीय जनता पक्ष श्रेष्ठींच्या निर्देशानुसार आगामी १० मे २०२३ रोजी होऊ घातलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुक प्रचारार्थ विजयपुर जिल्ह्यातील *देवर हिप्परगी* या मतदार संघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले सोमान गौडा पाटील यांच्या विजयासाठी संपुर्ण मतदार संघातील गांवागांवात विविध समाज घटक,बुथ प्रमुख, भाजपाचे विविध सेल पदाधिकारी यांचेशी बैठकी द्वारे तर जनतेशी थेट संपर्क करणार आहे. या दौ-यात नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे सोबत उमेदवार श्री.पाटील, मतदार संघ पक्ष प्रभारी व युपी चे माजी मंत्री आनंद स्वरूप शुक्ल, अनिल जमादार,भिमन गौडा सिध्दार्थ,प्रभु गौडा बिरासदार व सिध्दार्थ बुला आदी मान्यवरांचा समावेश राहणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून कळले आहे.