
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:-दि:-२५/०४/२०२३ अहमदपूर बस स्थानकात दि: २५/०४/२०२३ रोजी अहमदपूर चे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी व इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रवाशांसाठी मोफत पाणपोई सुरू करण्यात आली आणि अहमदपूर येथील पत्रकार बांधवांनी या चांगल्या कार्याची दखल घेऊन बातम्या ही प्रसिद्धी केल्या . जनतेकडून अगदी तोंड भरून कौतुक ही करण्यात आले मात्र दुसऱ्या दिवशी दि, २६/०४/२०२३रोजी बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती पाहण्यास मिळाली कारण कालच उद्घाटन झालेल्या पणपोईला आज कुलूप होते .अनेक प्रवाशी आपली पाणी पिण्याच्या तीव्र इच्छा घेऊन पाणपोई जवळ येऊन कुलूप बघून वापस जात होते. अनेकांनी पाण्यासाठी नेहमीप्रमाणे पैसे खर्च केल्याचे चित्र निर्दशनास दिसून येत आहे. एक दिवसात पणपोईला कुलूप असल्याने तहानलेल्या अनेक संतप्त प्रवाशांनी फक्त बातमी प्रसिद्धीसाठीच पाणपोई सुरू केली होती का ?” असे प्रवाशांच्या तोंडून प्रश्न ऐकायला मिळत आहे .