
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार/काटकळंबा :-कंधार तालुक्यातील काटकळंबा येथे विश्वरत्न, महामानव, प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण दिनांक २९/०४/२०२३ रोज शनिवारी दुपारी २ वाजता नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. विशेष उपस्थिती पु. भन्ते बोधीधम्मो,पु.भन्ते चंद्रमुनी,पु.भन्ते मेताधम्मो, व्यंकटराव पा. गोजेगावकर, सौ. प्रणिताताई चिखलीकर, बाबुराव केंद्रे, प्रविण पाटील चिखलीकर, माणिकराव मुकदम,सौ.चित्ररेखाताई गोरे,प्रल्हादराव केशटवार, श्रीमती पंचफुलाबाई वाकोरे सरपंच, जफरोद्दीन बाहोद्दीन, भगवान राठोड, आनंदराव शिंदे, शंकरराव ढगे, नरेंद्र गायकवाड, सचिन पाटील चिखलीकर,भि.ना.गायकवाड, सुधीर मांजरमकर, डॉ. मधुकर चावरे, मोहन चावरे, मिलिंद चावरे, संतोष जोंधळे, या मान्यवरांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. स्वागताध्यक्ष शिवाजी वाकोरे, मुंजाजी चावरे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती अशोक चावरे, जयंती मंडळ राजू चावरे, दिपक चावरे,अशोक चावरे, बालाजी चावरे, तुळशीराम चावरे, तुकाराम वाघमारे, किशन चावरे तसेच रात्री ८:२० वाजता भीम गीतांचा कार्यक्रम मराठवाड्याचा बुलंद आवाज प्रा. गौतम पवार भुकमारीकर यांच्या सह गायिका कुमारी पोर्णिमा कांबळे , या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून सहभागी व्हावे असे कळवले आहे.