
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार/पेठवडज :- पेठवडज सर्कलमध्ये दि. २७ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता विजेच्या कडकडासह वादळी वारे गारांचा तांडव सुरू झाला असून पेठवडज कल्हाळी ,शिरशी खु.,शिरसी बु.,गोणार ,येलुर ,मसालगा, कळका,मंगनाळी वरवंट व राहटी येथे नांदेड पेठवडज रस्ता झाड रोडवर पडून बंद झाला आहे.परिसरातील इतर गावांमध्ये घरावरील पत्रे उडून गेली आहेत.अर्धा तास गारांचा पाऊस वादळी वाऱ्यासह , गारा पडल्यामुळे
शेतकऱ्याची तारांबळ उडाली अनेक शेतकऱ्यांची हळद, ज्वारी, जनावराचे वैरण, आंबा,फळबागा व इतर रब्बी पिकांचे या गारा व पावसामुळे बरेचसे नुकसान झाले आहे.. काही शेतकऱ्यांनी हळद ,ज्वारी कापणी करून त्यावर ताटपत्री झाकण्यात आले होते परंतु सोसाट्याचा वारा असल्यामुळे हे देखील पावसाने भिजून नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे तोंडाशी आलेले शेतकऱ्याचे पीके गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकरी बांधवांनी मागणी केली आहे.