
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- परवा पार पडलेल्या अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालाच्या रात्री भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या वर राजकीय द्वेशापोटी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा कलम 353 प्रमाणे खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूडबुद्धीने, राजकीय द्वेशापोटी विनायकराव पाटील यांच्या वर दाखल केलेला खोटा गुन्हा त्वरित रद्द करावा अशी मागणी शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या कडे केली आहे.
विनायकराव पाटील यांचे राजकीय चारित्र्य हनण करण्यासाठी निवडणूक अधिकारी व प्रशासनाला हाताशी धरून जाणीव पुर्वक विरोधकांनी राजकिय दबाव आणून खोटा गुन्हा दाखल केला आहे. माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या वर दाखल केलेला खोटा गुन्हा दोन दिवसांत रद्द करावा अन्यथा अहमदपूर शहरासह तालुक्यात न्याय मागणीसाठी सनदशीर मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्याचा लेखी इशारा निवेदनाद्वारे दिला असून निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी लातूर, पोलीस अधीक्षक लातूर यांनाही दिली आहे.
सदरील शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष अॅड. भारत चामे, माजी सभापती अॅड. आर. डी. शेळके, प्रविण रेड्डी, ज्ञानोबा बडगिरे, शेषराव राठोड,भाजपचे प्रदेश सदस्य परमेश्वर घोगरे, इतिराज केंद्रे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी,बालाजी सारोळे, अॅड.अमित रेड्डी,पंचायत समितीचे सदस्य रामभाऊ नरवटे,नीळकंठ पाटील,डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी,शंकर अप्पा भालके, राजकुमार खंदाडे,शिवानंद भोसले,राहुल शिवपुजे,किशोर कोरे,नाथराव केंद्रे, शिवकुमार उटगे, रामभाऊ बेल्लाळे,निखिल कारनाळे, विलास पाटील,महेश बिलापट्टे,विलास शेटे, धनराज पाटील,खिजर जागीरदार, व्यंकट दहिफळे, परमेश्वर सुर्यवंशी, अनिल कांबळे, निळकंठ हांभीर, भास्कर कदम, चंद्रजित पाटील,शंकर मुळे, माणिक कदम, प्रताप पाटील, बालाजी मुंडे,देवीदास सुरनर,बालाजी कदम,गणेश हालसे,व्यंकट सुर्यवंशी, नागनाथ माने, मारोती ढाकणे,वसंत मुंडे, दत्ता सुरनर, नरसिंग कोंडेवाड, प्रदीप खोमणे, संजय मिरजगावे,विजय पाटील,संग्रांम नरवटे, मोहन मुरुडकर,बापुसाहेब मोरे,गणेश मुंडे, युनूस गोलंदाज, बालाजी वलसे,शिवराज पाटील, शिवचंद्र मलफेदवार, बबनराव नवटक्के,राम देवकते,बालाजी हेमनर,गोविंद दगडे,विनोद भुतडा,गजानन मुंडे, ज्ञानोबा मंतलवाड,इस्माईल किनीवाले, मतानुसार जागीरदार, रमाकांत आरनुरे, संजय बारुळे,तुकाराम सांगवीकर, बालाजी जाधव, दत्तात्रेय कातकडे,माधव मोरे, शिवराज पाटील, सुनील शेटकर, माधव नागरगोजे,यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माजी मंत्री विनायकराव पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व प्रथम शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर सदरील शिष्टमंडळाने एका रांगेत शांततेत जाऊन तहसीलदारांना निवेदन दिले