
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
अजीत सीड्स प्रा. ली छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
यांचे तर्फे आयोजित कार्येक्रम शेतकरी सन्मान योजना अंतर्गत दिनांक 4 मे 2023 मौजे वर्ताळा ता. मुखेड जिल्हा नांदेड येथे आयोजित केला होता वर्ताळा या गावातील प्रगतिशील शेतकरी उत्तम गोविंद आगलावे यांचा अजीत कंपनी तर्फे अजीत1199 या वाणाचे उचांकी उत्त्पन्न घेतल्याबद्दल सर्व गावकरी यांच्या समक्ष गावचे सरपंच आनंद बळीराम आगलावे यांचे तर्फे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला तरी या कार्येक्रमासाठी गावातील प्रगतिशील शेतकरी देविदास पुंडलिक डावकोरे तसेच गावचे ग्राम विकास अधिकारी हणमंत शेषराव डावकरे , राजेंद्र वर्ताळकर , केरुरे तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव आगलावे, भाऊसाहेब आगलावे , भगवान जायेभाये , रवी जायभाये , प्रमेश्वर डावकरे तलाठी चव्हाण साहेब उपस्थित होते या कार्येक्रमसाठी कंपनीचे मुखेड प्रतिनिधी शंकर कौंसल्ये यांनी कापूस पिकाविषयी सखोल असे मार्गदर्शन केले आणि सत्कार मूर्ती उत्तम गोविंद आगलावे यांनी आपले अजीत 1199 या वाणाचे अनुभव शेतकरी याना सांगितले आणि सर्व शेतकरी बांधवांनाआवाहन केले की अजीत बियाणे वापरून जास्तीत जास्त फायदा करून घ्यावे ।।