
दैनिक चालू वार्ता बल्लारपूर तालुका प्रतिनिधी -श्री कमलेश नेवारे
आज दि.०८/०५/२३ रोज सोमवार ला ग्रामपंचायत कार्यालय नांदेड प. स. लाखांदूर जि.भंडारा येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनीकरण ऊद्द्घाटन सोहळा पार पडला.मागील वर्षी नुकतीच निवडणुका १८/१२/२२ ला घेण्यात आली होती या ग्रामपंचायतीवर बहुमान पटकावित श्री. अरुणजी बावनकर यांनी बहुमताने विजय मिळवला.
नवनिर्वाचित सरपंच भाषणात म्हणाले गावातील समस्यांची जबाबदारी घेत विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच गावातील नागरिक , प्रतिष्ठित व्यक्ती यांचे सुद्धा आभार मानले. तसेच चालू वर्षात इय्यता १०वी मधील जो विद्यार्थी पहिल्या क्रमांकावर स्थान पटकाविल त्यांना श्री. अरूणजी बावनकर (सरपंच) यांचे कडून *५०००/-* रोख व प्रमाणपत्र देण्यात येईल असे ते बोलत होते .
ऊद्द्घाटक म्हणून लाभलेले श्री.कृष्णाजी नामदेव नेवारे (बल्लारपूर) यांचा हस्ते रिबीन कापून ग्रा .प. कार्यालयाचे नूतनीकरण सोहळा कार्यक्रम पार पाडण्यात आला. सोबतच ग्रा .प. सरपंच श्री.अरुणजी बावनकर , उपसरपंच श्री.मनोहरजी बोरकर ,
मार्गदर्शक (जि.प.शाळा नांदेड) श्री.जांभूळकर सर , पोलिस पाटील श्री.जयघोष मोहरकर , प्रमुख अतिथी माजी सरपंच सौ. सरिताताई अरुण बावनकर , ग्रा.प.सद्यस्य श्री.रामप्रभु साठवणे , सौ. नलु किशोर नेवारे , सौ. प्रियंका मेश्राम , सौ. ज्ञानेश्वरी खोब्रागडे , सौ. शिल्पा सांगोडे , माजी सद्यस्य श्री. जनार्धनजी आकरे , सौ. सुवर्णा मनोहर नेवारे , सौ. ममता हजारे , श्री. विनोदजी साठवने.सहकारी सोसायटी अध्यक्ष श्री. विलासजी बावनकर , शिक्षण समिती अध्यक्ष श्री. वामनजी शनिवारे व गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून श्री. लालाजी बावनकर , श्री. भाऊरावजी आकरे , श्री. जगदिश बावनकर , श्री. बाळाजी बावणे , श्री. भाऊरावजी मरगडे, श्री. दिगांबरजी नागपुरे , श्री. कृष्णाजी हजारे , श्री. तेजरामजी हजारे , श्री. ऋषिजी नेवारे , श्री. मनोहरजी नेवारे , श्री. जगदिशजी वैद्य , श्री. तुकारामजी वैद्य , श्री. दिलखुशजी बावनकर , श्री. सचिनजी आकरे , श्री. प्रचीनजी वलथरे , श्री. भोजराजजी बंसोड , आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. धूर्वे सर यांनी केले व आभार प्रदर्शन ग्रा.प. ऑपरेटर सौ. रुपाली वैद्य यांनी मानले.