
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार:- कंधार तालुक्यातील बारूळ कॅम्प ते महादेव मंदिर रस्त्यांचे काम एकसाईट पूर्ण होऊन सुध्दा साईट मुरूम भरले नसल्यामुळे रोडवर वाहतुकीस प्रचंड त्रास होत असून दोन दोन तास ट्राफिक जॅम होत असून त्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना व प्रवाशांना होत आहे संबंधित अधिकारी व गुत्तेदार याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नांदेड पेटवडज जाणारी बस एक महिन्यापासून बंद आहे तरी ते अपुरे काम पूर्ण करावे तसेच बारूळ येथील पुलाच्या दोन्ही बाजूंनी दबई करून पुल दुरूस्त करून देण्यात यावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड याच्याकडे पांडुरंग कंधारे,व्यंकटी जाधव,गजानन जाधव,हरीचंद्र राजे, यांनी केली आहे