
दैनिक चालू वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
पुणे : प्रदर्शनापुर्वीच विविध कारणांनी चर्चेत राहिलेला आणि प्रदर्शनानंतरही वादाचा विषय ठरत असलेला दि केरला स्टोरी हा चित्रपट वास्तवाचे भान करून देणारा असून या चित्रपटातून खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीचे दर्शन घडत आहे या चित्रपटामुळे समाजामध्ये जागरूकता निर्माण होऊन उत्तम प्रकारचे समाज प्रबोधन होत आहे त्यामुळे हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी पुण्यातून पतित पावन संघटनेच्या वतीने निवेदनाव्दारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि , दि केरला स्टोरी हा चित्रपट समाजातील लव्ह जिहाद यासारख्या माध्यमातून सुरु असलेले हिंदु मुलींचे धर्मांतर करून त्यांच्यावर केला जाणारा अन्याय आणि अत्याचार या वास्तवावर भाष्य करतो म्हणूनच त्याला विरोध करण्याचं काम काही स्वतःला बुद्धिवादी म्हणून घेणारी मंडळींकडून होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटकापर्यंत हा चित्रपट पोहोचल्यास त्यातून एक चांगल्याप्रकारे जनजागृती व समाजप्रबोधन होईल व लव्ह जिहाद यासारख्या गोष्टीना आळा बसण्यास मदत होईल त्यासाठी हा चित्रपट हा चित्रपट करमुक्त करा याविषयीची मागणी निवेदनाव्दारे पतित पावन संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील आणि खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष विजय क्षीरसागर यांनी केली आहे.