
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक -दीपक कटकोजवार
राज्यभरातील पत्रकारांच्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोंडपिपरीत व्हाॅईस आँफ मीडियाच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी पत्रकारांनी सुमारे तीन तास ठिय्या दिला.
सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत धरणे ठिय्या आंदोलन करणार आले. यावेळी व्हाॅईस आँफ मीडियाचे गोंडपिपरी तालुक्यात कार्यरत असलेल्या संपुर्ण विंगचे तालुका पदाधिका-यांसह विविध माध्यमातील कार्यरत पत्रकारांनी आपला सहभाग नोंदविला. आंदोलनानंतर तहसिलदार यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. पत्रकारांच्या मागण्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तुकाराम झाडे,कार्यध्यक्ष निलेश संगमवार,भाजपाचे तालुका अध्यक्ष बबन निकोडे,कार्यध्यक्ष साईनाथ मास्टे,माजी नगराध्यक्ष संजय झाडे,गोंडपिपरी बार कांसिलचे अध्यक्ष ॲड.राकेश कांबळे,अड.प्रफुल्ल आस्वले,व्यापारी संघटनेचे पदाधिकारी सुहास माडूरवार,वैद्यकीय अधिकारी डा.अगडे,नगरसेवक महेन्द्रसिंह चंदेल,सामाजिक कार्यकर्ते दामोधर गरपल्लीवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तालुक्यातील जवळपास २०पेक्षा अधिक पत्रकारांनी आंदोलनात सहभागी होवून मागण्या लावून धरल्या. यावेळी सर्वश्री संदीप रायपूरे,बाळू निमगडे,राजू झाडे,राजकपूर भडके,बाबुराव बोंडे,सुरज माडुरवार,प्रमोद दुर्गे,प्रशांत कोसनकर,संदीप गव्हारे,कुणाल गायकवाड,नितीन पुद्दटवार,युवराज फलके,प्रसन्नजित डोंगरे,चेतन मांदाडे,हर्ष महेशकर आदींनी सहभाग दिल्याची माहिती पत्रकार आशिष निमगडे यांनी दैनिक चालु वार्ता ला कळविले आहे.