
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील माळेगाव गावाला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या योजनेचे पाईपलाईन सुपीक जमिनीतून विनापरवानगी नेऊन यंत्राच्या साह्याने जमिनीचे उत्खनन केल्याने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून याप्रकरणी संबंधित अभियंता व कंत्राटदा रावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आत्मदहनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
तालुक्यातील मौजे माळेगाव मक्ता येथे पांडुरंग लोकडोजी ढगे यांच्या मालकीची गट नंबर १६३ मध्ये जमीन असून या शेतीत त्यांना फळबागेची लागवड करावयाची असल्याने त्यांनी गतवर्षीच जवळपास ५ हजार ब्रास शेततळ्यातला गाळ आणून टाकला होता. या फळबागेसाठी त्यांना शेतात दोन शेततळे ही घ्यावयाचेहोते. येथील पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्याने व संबंधित कंत्राटदारांनी संबंधित शेतकऱ्याची परवानगी न घेता शेतीचे रातोरात उत्खनन केले त्यामुळे मातीचा थर बाजूला
जाऊन खालील मुरमाचा थर वर पडल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. यासंदर्भात संबंधित अभियंत्याकडे वेळोवेळी व पाठपुरावा करून दुरुस्त करून देण्याची मागणी केली असता शेतकऱ्यांना उ- डवा उडवीचे उत्तरे दिले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यंत्राच्या साह्याने शेताचे उत्खनन केल्याने शेतातील
काळ्या मातीचा थर इतरत्रफेकून वरच्या बाजूला मुरूममोठ्या प्रमाणात पसरल्याने सध्या फळबागासाठी ही शेती उपयुक्त राहणार नाही. त्यामुळे या घटनेने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.वास्तविक ही पाईपलाईन शेताच्या एका बाजूने गावाला नेता आली असती मात्र झाले योजनेच्या आलेल्या पैशावर डल्ला मारण्यासाठी अभियंता कंत्राटदराने मिलीभगत जमीन करत हा प्रकार केला आहे. हेतूपुरसर शेतीचे नुकसान करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित अभियंत्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून पीडित शेतकऱ्याची जमीन व्यवस्थित करून द्यावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी पांडुरंग ढगे यांनी दिला आहे.