
दैनिक चालू वार्ता नांदेड शहर विशेष प्रतिनिधी-प्रा. विजय दिग्रसकर
इयता 10 वी आणि 12 वीचे सी.बी.एस.ई. बोर्ड परीक्षेचे निकाल शुक्रवारी जाहिर झाले. नांदेड शहरातील विविध शाळांच्या निकाल पहाता सर्वच शाळांचे निकाल हे चांगले लागले आहेत. यात ऑक्स्फर्ड इन्टरनॅशल स्कुल मधून 201 विद्यार्थ्यापैकी 200 ( 99.5% )विद्यार्थी उत्तीर्ण ,सांदिपनी इंटरनॅशनल स्कूल ( 100% ), किड्स किंगडम पब्लीक स्कुल (96% ) ऑक्स्फर्ड द ग्लोबल ( 100% ) नागार्जूना पब्लीक स्कूल (100 % ) इ. एकूण निकालाचा विचार करता गुणांच्या बाबतीत मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त आहे त्यामूळे मुलांपेक्षा मुलीच भारी ठरल्या आहेत.