
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक- दीपक कटकोजवार
बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या माध्यमातून दि.१२ मे २०२३ ला भंडारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन” (समाज कल्याण) येथे महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२३” चा वितरण समारंभ पार पडला. या अनुषंगाने युवा पत्रकार अभिजीत मडावी यांना उपरोक्त
पूरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मुंबई येथील सुप्रसिद्ध सिने गायिका वैशाली सामंत व भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहीत मतानी साहेब व महाराष्ट्र लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक शशिकांत भोयर , मराठी पत्रकार संघटने अध्यक्ष चैतन भैरव, रोटरी क्लब भंडारा जिल्हा अध्यक्ष मा. ऑड. किशोर लांजेवार व लोकसत्ता जिल्हा प्रतिनिधी नागपूर व भंडारा व ABP माझा प्रतिनिधी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.