
दैनिक चालु वार्ता पैठण तालुका प्रतिनिधी- गजानन ठोके
शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ज्या कापूस पिकास ओळखले जाते त्याच कापूस पिकास यंदा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी केल्याचे चित्र राज्यसह पैठण तालुक्यातील प्रत्येक गावात दिसून येत आहे
गेल्या वर्षी कापसाला 10000 ते 13000 असा भाव मिळाला यंदाही चांगला भाव मिळेल या आशेने पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कापसाची लागवड केली महागडी खते औषधी यांचा वापर करून कापूस पिकास बराच खर्च केला परिणामी पीकही जोरदार आले
यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात कापसाला 9000 ते 9500 दर मिळाला अजून भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली नाही परंतु नंतरच्या काळात कापसाचे दर सातत्याने कमी कमी होत गेल्याने शेतकऱ्यांनी कापूस काहीच विक्री केला नाही आज घडीला शेतकऱ्यांकडे 35 ते 40 टक्के कापूस घरात पडून आहे
सध्या कापसाला सात हजार ते साडेसात हजाराचा भाव आहे दोन ते अडीच हजार क्विंटल मागे तोट्याने शेतकरी कापूस विक्रीस तयार असून व्यापारी मात्र कापूस खरेदीस टाळाटाळ करीत आहे आजूबाजूच्या परिसरातील जिनिंगही बंद होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांवर कुणी कापूस घेता का कापूस म्हणण्याची वेळ आली आहे
प्रतिक्रिया( 1)
नोव्हेंबर महिन्यापासून कापूस घरात साठवलेला आहे नऊ हजार रुपये क्विंटल ला भाव होता तेव्हा कापूस विकला नाही आता मी साडेसात हजार प्रतिक्विंटल ने कापूस द्यायला तयार आहे परंतु व्यापारी कापूस घेण्यास तयार होत नाही
मथाजी ठोके कापूस उत्पादक शेतकरी
(2) सध्या कापसाला बाजारात मागणी नसल्याने भाव दररोज कमी होत आहेत कमी बाजार भाव वाढलेली गाडी भाडे मजुरांची टंचाई यामुळे कापूस खरेदीस अडचणी येत आहेत
इरफान सय्यद कापूस व्यापारी