
दैनिक चालु वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
==================
निलंगा: दिनांक १३/०५/२०२३ रोजी निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या व निलंगा तालुका युवक काँग्रेस च्या वतीने निलंगा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय नेते *मा.श्री अशोक शिवाजीरावजी पाटील निलंगेकर* साहेबांच्या नेतृत्वाखाली निलंगा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाक्याची आतिश बाजी करत जल्लोष करण्यात आला. यावेळी बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की कर्नाटकातील जनतेचा विश्वास संपादन करून जाहीरनामा मध्ये दिलेल्या आश्वासनाची कॅबिनेटच्या पहिल्या मंत्रिमंडळात अंमलबजावणी करण्यात येईल.व येणाऱ्या चार राज्यात काँग्रेसचा पताका फडकवण्याची त्याचप्रमाणे महाराष्ट्रात व देशात काँग्रेसची सत्ता येईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला व त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय *मल्लिकार्जुन खरगे साहेब*,काँग्रेसचे महासचिव *प्रियांकाजी गांधी*, युवकांचे आशास्थान *राहुलजी गांधी*, *डी के शिवकुमार* त्यांचे अभिनंदन केले व भालकी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले *ईश्वरजी खंडरे* यांचे अभिनंदन केले त्यासोबतच महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष *नानाभाऊ पटोले* यांनी माझी पक्ष निरीक्षक म्हणून भालकी मतदारसंघासाठी नियुक्ती केली व काम करण्याची संधी दिली व हे काम मी सार्थ करून दाखवले,त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.असे ते म्हणाले यावेळी माजी नगराध्यक्ष हमीद शेख, महाविकास आघाडी समन्वयक दयानंद चोपणे,अल्पसंख्याचे तालुक्याध्यक्ष लाला पटेल लहुजी शक्ती सेनेचे गोविंद सूर्यवंशी,निलंगा विधानसभा युवक अध्यक्ष अमोल सोनकांबळे, निलंगा विधानसभा सरचिटणीस तथा NSUI जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद झरकर, शहराध्यक्ष मुजीब सौदागर,अँड तिरूपती शिंदे,सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत कांबळे,मा. नगरसेवक प्रकाश बाचके, मुगळे विलास,तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस,पुरुषोत्तम कुलकर्णी,शेषराव कांबळे, सिद्धू आवले, वीरभद्र आग्रे, सबदर कादरी, अबरार देशमुख, रोहन सुरवसे,बालाजी गोमसाळे, महेश कदम, अजय कांबळे, अनिल अग्रवाल,सरपंच हरिदास बोळे,मा. नगरसेवक अजगर अन्सारी यांच्यासह काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी , नगरसेवक ,नेते कार्यकर्ते लक्षणीय संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.