
दैनिक चालु वार्ता चिखलदरा ता.प्रतिनिधी -प्रवीण मुंडे
अमरावती (चिखलदरा) :- सामुदायिक आरोग्य केंद्र चिखलदरा येथे शनिवारी सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन करण्यात आले.सोनोग्राफी मशीन चालू झाल्याने मेळघाटातील
अति दुर्गम भागात गरोदर महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.परतवाड्याचे डॉक्टर अल्केश केजरीवाल दर शनिवारी चिखलदरा येथे सोनोग्राफीची सेवा देणार आहे.
मेळघाटात चिखलदरा परिसरात नेहमीच आदिवासी क्षेत्र असल्याने गैरसोईची चर्चा असतात.पण आता सोनोग्राफी मशीन चालू झाल्याने गैरसोय होणार नाही डॉक्टर संजय पवार
यांच्या सहकार्याने मशीन बसवण्यात आली आणि ३० ते ३५ महिलांनी सोनोग्राफीचा लाभ सुद्धा घेतला.गरोदर महिलांना परतवाडा किंवा चिखलदरा वेळेवर पोहचणे शक्य नसल्याने
आता सोनोग्राफी मशीन चुरनी येथे उपलब्ध करून द्यावी अशी येथील नागरिकांची मागणी असून ही सुविधा ग्रामीण रुग्णालय चुरणी ला जर मिळाली तर हतरू आणि चुरणी सर्कलमधील नागरिकांची दैना दूर होईल आणि रुग्णांची गैरसोय होणार नाही.