
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
®®®®®®®®®®®®®®®®
यवतमाळ देवळी येथे या वर्षी कापसाचे उत्पादन कमी झालेले दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्याने आपला कापूस भाव वाढीच्या आशेने घरामध्येच ठेवला होता सर्वप्रथम कापसाचे भाव सुरवातीला ९हजाराच्या वर गेले होते त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात आशा निर्माण झाली की यावर्षी सुद्धा कापसाचे भाव १०हजार रु प्रति क्विंटल च्या वर राहील अशी आशा होतील परंतु वेळ निघत गेली आणि कापसाचे भाव साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत घसरून गेले आता अर्धा मे महिना निघून गेला आहे शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीकडे लक्ष लागले आहे येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्याला बी बियाणे घेण्यासाठी पैशाची गरज भासत आहे अशावेळी कापूस घरामध्ये ठेवून चालणार कसे न इलाज वास्तव आता शेतकऱ्याला काय करावे काय नाही सुचेनासे झाले आहे सुरुवातीला ९ हजार रुपये प्रति क्विंटल कापूस दरामध्ये न विकलेल्या कापसाला आता ७३०० रूपयांपेक्षा आत प्रतिक्विंटल विकावे लागत आहे त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे.