
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी -गजानन ठोके
मौजे कोळी बोडखा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची 366 वि जयंती उत्साहपूर्वक वातावरणात साजरी करण्यात आली गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री लतीफ सय्यद सर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून राजेंना अभिवादन करण्यात आले
यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे श्री रमेश पाटील चावरे यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या त्यागाची शौर्याची व स्वराज्यातील पराक्रमांची माहिती आपल्या भाषणातून गावकऱ्यांना दिली यावर्षीपासून शासकीय स्तरावर राजांची जयंती साजरी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
या कार्यक्रमास सरपंच श्री लतीफ सय्यद सर उपसरपंच विलास बापू गायकवाड सोसायटी सदस्य मुसा सय्यद भाजपा तालुका उपाध्यक्ष रमेश पाटील चावरे इरफान सय्यद राम गायकवाड मुजीम पटेल ( ग्राम रोजगार सेवक ) तय्युम पटेल युवा नेते सतीश गायकवाड जमीर शेख नाना काळे गणेश ठोके संतोष गायकवाड मुन्नाभाई नु ह आली सय्यद बद्री ठोके ज्ञानेश्वर ठोके रामभाऊ गायकवाड दैनिक चालू वार्ता चे पत्रकार गजानन ठोके आदीसह गावकरी उपस्थित होते