
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी तालुका किनवट च्या वतीने सर्वसामान्य दिन दलित गोरगरीब लोकांना हक्क मिळवून देण्यासाठी किनवट तालुका कार्यकारणी चा विस्तार होण्यासाठी आज दिनांक २०.मार्च मौजे इस्लापूर विश्रामगृहात या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे किनवट तालुका सचिव संतोष शेरे यांनी नांदेड कार्यकारणी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष पक्ष बांधणी उपक्रम राबविला आहे . यावेळी नांदेडचे राजेश्वर हत्तीअंभोरे पालमकर वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा महासचिव मा. शैलेशजी लवटे , मा . माधवदादा जमदाडे , मा . राजू वाठोरे , अमर हत्तीअंबोरे , रविराज दूधकवडे ,या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वाढीस तालुका कार्यकारणी व पदाधिकारी इस्लापूर येथील विठ्ठलराव गडपाळे देविदास भालेराव, जगदीश हनवते , गौरव कदम , पत्रकार दै. लोकमंथन विशाल भालेराव अन्य मान्यवर उपस्थित होते
येणाऱ्या आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकां येत असल्याने सर्कल प्रमाणे वंचित बहूजन आघाडी यांनी पक्ष बांधणी सुरू केली आहे . जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपरिषदा , यामध्ये भरगोश यश मिळवण्यासाठी गाव पातळीवर जिल्हा परिषद सर्कल तालुका पक्ष बांधणी . सर्कल शाखा बांधणी , बुध बांधणी यामध्ये विस्तार करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीअंबोरे पालमकर व माधवदादा जमदाडे यांनी आज इस्लापूर , बोधडी , किनवट ,घोटी , अंबाडी , मांडवी तालुक्यातील अशा अनेक गावांना भेटी देऊन पक्ष बांधणी केली आहे .