
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
पुणे: हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती धनकवडी येथे मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली येथील श्री छत्रपती शिवशंभु जन्मोत्सव समिती, धनकवडी गाव यांच्या वतीने या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
एक गाव एक उत्सव ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या जन्मोत्सवामध्ये समितीसह, धनकवडी येथील विविध गणेश मंडळे, सर्व हिंदुत्ववादी संघटना , सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, गृहनिर्माण सोसायट्यांचे सदस्य आणि अनेक युवकांचे ग्रुप सहभागी झाले होते या सर्वांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांची दिमाखदार पालखी मिरवणूक सोहळा पार पाडला. चैतन्य नगर येथे महिलांच्या हस्ते आरती करून मिरवणूकीला सुरुवात झाली त्यानंतर शेवटचा बस स्टॉप,पालखी मार्ग ,सावरकर चौक, दत्तमंदिर मार्गे ग्रामदैवत जानुबाई देवी मंदिर येथे देवीची आरती म्हणून मिरवणूक पार पाडली.