
दैनिक चालु वार्ता कळंब – समीर मुल्ला
सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कळंब येथील शासकीय विश्रामगृहात प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ तथा अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ रामकृष्ण लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले .
प्रमुख पाहुणे म्हणून बळीराम ढवळे,उप शिक्षण अधिकारी परभणी ,मनोहर हारकर माजी नगरसेवक, हे उपस्थित होते .
या बैठकीत विविध समित्या स्थापन करण्यात आल्या त्यामध्ये कळंब तालुका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी शेंडगे ,उपाध्यक्ष म्हणून हरीभाऊ शिंपले,नितिन हारकर,कार्याध्यक्ष विकास मदने ,दिनेश गायके, पांडुरंग लोकरे,सचिव पांडुरंग कवडे ,कोषाध्यक्ष अशोक शिंपले,किशोर माने, प्रसिद्धी प्रमुख दत्ता गायके,सुनील लीके, अजित गायके, व्याख्यानमाला प्रमुख प्रा दादाराव गुंडरे, प्रा हनुमंत कोकाटे, सचिन सलगर, परमेश्वर वाघमोडे, चंद्रकांत रोडे, मुकुंद धायगुडे, कायदेशीर सल्लागार म्हणून अँन्ड गोरख कस्पटे, अँन्ड विश्वजीत दुगाने, अँन्ड अभिमन्यू लोकरे, मिरवणूक प्रमुख भास्कर पारेकर,रोशन वाघमोडे, आण्णा वाघमोडे, सचिन शेंडगे,खंडु शिंपले,या समितीचे मार्गदर्शक म्हणून डॉ सत्यप्रेम वारे, गोकुळदास करडे .
या बैठकीत सर्वानुमते असे ठराव मंजूर करण्यात आले की कळंब शहरातुन गजे ढोलाच्या माध्यमातून मिरवणूक काढणे, जयंतीनिमित्त तिन दिवषीय व्याख्यानमालेचे आयोजन करणे .धनगरी ओव्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करणे . धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे. तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय कार्यकर्ते ,पक्ष पदाधिकारी ,पञकार, यांचा सत्कार करणे.कळंब शहरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलां चा सन्मान, करणे अहिल्यादेवी होळकर चौकाचे सुशोभीकरण करने, धनगर समाज एस टी आरक्षण (अनुसुचित जामाती) चे समाज प्रबोधन करणे , अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील दोन कर्तुत्व वान महिलांचा सन्मान करण्याचे परीपत्रक राज्यातील सर्व ग्राम पंचायतींना जारी केले आहे त्या बद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानणारा ठराव पारीत करण्यात आला.
त्याच धर्तीवर शहरी भागातील कर्तुत्ववान महिलांचा देखिल सन्मान व्हावा या संदर्भात महाराष्ट्र शासनाला मागणीचे पत्र देण्याचे ठरले. आहे
तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिपक हारकर कार्यालयीन अधिक्षक न प कळंब, यशवंत हारकर वरिष्ठ लिपिक उप जिल्हाधिकारी कार्यालय कळंब, किरण पानढवळे,मा नगरसेवक न.प कळंब. या बैठकीत वरील सर्व ठराव मंजूर करण्यात आले. या बैठकीस कळंब शहरात व तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते