
दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव -नवनाथ यादव
भू म :- कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमतात कर्नाटकच्या जनतेने विजय मिळवून दिल्याबद्दल भूम काँग्रेस कमिटीच्या वतीने एकमेकांना पेढे भरवून तसेच फटाके वाजवून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, तालुका कार्याध्यक्ष ऍड. सिराज मोगल, माजी नगरसेवक सोपान वरवडे, जेष्ठ नेते बाशाभाई शेख, तालुका उपाध्यक्ष ऍड. घनश्याम लावंड, तालुका किसान सेल तालुकाध्यक्ष राम सावंत, युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष मोईज सय्यद, कोहिनुर सय्यद , इकबाल पठाण, फेरोज बागवान,महादेव जाधव, गुड्डू कुरेशी तसेच काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.