
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कलंबर :- संजय गांधी उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील कला व विज्ञान शाखेचा निकाल अतिशय चांगला लागला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ८६.११℅व कला शाखेचा निकाल ७३.०७℅ लागला आहे.विज्ञान शाखेतून प्रथम मैलारे प्रतिक्षा पांडुरंग,व्दितीय मेहर वैष्णवी दिलीपसिंह तिसरी घोरबांड ॠतुजा पुरभाजी तसेच कला शाखेतून प्रथम ठाकूर बयास सौंदर्या सुमेरसिंह,व्दितीय वर्ताळे सुष्टी मधूकर, तिसरी गुणावत साक्षी राजुसिंह तसेच विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे प्राध्यापक प्राध्यापिका व तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे कॉलेजच्या वतीने मुख्याध्यापक एस. एन. मामडे तसेच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री मारुतीराव पाटील घोरबांड यांच्या वतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.