दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड दि 25मे
दैनिक चालू वार्ता अंकाचे जिल्हा अध्यक्षाच्या हस्ते विमोचन. गेल्या दोन वर्षापासून दैनिक चालू वार्ता पेपर पीडीएफ च्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वत्र वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता.
चौकट
दैनिक चालू वार्ता पेपर हा, गोरगरीब दीनदलित कष्टकरी,शेतकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते व अन्यायविरोध आवाज उठवणारा पेपर म्हणून दैनिक चालू वार्ता कडे आता लोक पाहत आहेत.
दैनिक चालू वार्ता च्या वाचकाची वाढती संख्या लक्षात घेऊन दैनिक चालू वार्ताचे संपादक डी.एस.लोखंडे पाटील (मुख्य संपादक )यांनी दि 25मे रोजी प्रथमच महाराष्ट्रात प्रथमच सर्वत्र स्टॉलवर वाचकांसाठी सर्वत्र पेपर उपलब्ध करून दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मुखेड तालुक्यात भाजपाचे जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर, यांच्या हस्ते दैनिक चालू वार्ता पेपरच्या अंकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी उपस्थित, ह.भ.प वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर महाराज बोमनळीकर, अवधूत महाराज गिरी, नरसिंग महाराज केरुरकर, श्रीपत महाराज पिंपळकुंटेकर, टीव्ही सह्याद्रीचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल पाटील, शिवकुमार बिरादार, संग्राम पाटील तांदळी कर, व बोमनाळी गावातील, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सर्व सन्माननीय मंडळी, व गावातील गावकरी, तसेच वारकरी संप्रदायातील मंडळी महिला लहान थोर सर्व उपस्थित आमच्या समोर कार्यक्रम पार पडला.


