दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:सर्वसामान्य नागरिकांना ६०० रुपयात एक ब्रास वाळू देण्याचे स्वप्न शासनाने दाखविले होते. १ मे पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली होती. त्यामुळे तालुक्यातील अनेकांनी आपल्या घराचे बांधकाम थांबवून या शासकीय वाळू डेपोची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर २२ मे रोजी शेवाळा येथील वाळू डेपोचे उद्घाटन करण्यात देगलूरकरांना लवकरच सहाशे रुपयात एक ब्रास वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आल्याने
जिल्ह्यात सात ठिकाणी असे वाळू डेपो उभारण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला होता.
त्यापैकी देगलूर तालुक्यातील शेवाळा याठिकाणी वाळू डेपो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आशिक अहमद शेख (रा. बेटमोगरा) या कंत्राटदारास ४० हजार ब्रास वाळूची परवानगी देण्यात आली आहे. या वाळूडेपोचे नुकतेच प्रभारी जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, देगलूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम, बिलोलीचे तहसीलदार निळे, देगलूरचे नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड,मंडळ अधिकारी पुष्पलवार, तलाठी ठाकूर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे विजय महाजन, देगलूरचे कावळगडे, मसु हंबर्डे हे उपस्थित होते शासनाच्या निर्णयानुसार सहाशे रुपयांना एक ब्रास वाळू मिळण्यासाठी नागरिकांना सेतू सुविधा केंद्रावर बांधकाम परवानगी यासह पत्ता दर्शविण्यासाठी आधार कार्डची ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर बांधकाम परवानगीनुसार लागणारी वाळू सहाशे रुपये ब्रासप्रमाणे व सदरील वाळू दिलेल्या ठिकाणावर घेऊन येण्यासाठी लागणारे वाहतूक खर्च वेगळा द्यावा लागणार आहे. असे महसूल यंत्रणांनी सांगण्यात आले.


