दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव .
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारा फेब्रुवारी/ मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून नांदेड येथील शैक्षणिक दृष्ट्या नावाजलेले श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड चा एकूण निकाल 86 टक्के लागला असून विज्ञान शाखेचा 96.13% तर कला, शाखेचा 72.34% आणि वाणिज्य शाखेचा 88.89% निकाल लागला असून यामध्ये विशेष प्राविण्यासह 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत 94 , द्वितीय श्रेणीत 200 व उत्तीर्ण श्रेणीत 120 विद्यार्थी पास झाले आहेत या त्यांच्या यशस्वीतेबद्दल संस्था अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम केशवराव धोंडगे , संस्था सचिव ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई गुरुनाथराव कुरुडे , संस्था सहसचिव एडवोकेट मुक्तेश्वर केशवराव धोंडगे , संस्था संचालक मंडळ सदस्य प्रा.वैजनाथराव कुरुडे , प्राचार्य सुधीर कुरुडे , उपप्राचार्य परशुराम येसलवाड , शालेय समिती सदस्य सूर्यकांत कावळे, एम. पी. कुरुडे , इंद्रजीत बुरपल्ले , पर्यवेक्षक माधव ब्याळे माध्यमिकचे पर्यवेक्षक सदानंद नळगे शिवराज पवळे कौठा इन्चार्ज सय्यद जमिल इत्यादी मान्यवरांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व पालकांचे आणि कॉलेजच्या सर्व स्टाफचे अभिनंदन करून कौतुक केले.


