दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे व खत आणि औषधे मिळण्यासाठी खरीप हंगाम २०२३ सालासाठी बियाणे व खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी खतांचा साठा तालुका पातळीवर समिती नेमून प्रत्येक दुकानदारावर नियंत्रण ठेवणे. यासाठी समिती नेमिने त्या समितीमध्ये शेतकरी प्रतिनिधी असावे २०२०च्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे बोगस देण्यात आले व शेतकऱ्यावर तीन वेळा पेरणी करण्याची वेळ आली होती. २०२० कोरोना संसर्गामुळे शेतीमाल विक्रीसाठी अनेक अडथळे निर्माण होऊन आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले तेव्हा २०२३ खरीप हंगामासाठी समिती नेमून शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व्यंकट जाधव पांडुरंग कंधारे गजानन जाधव यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे व तहसीलदार कंधार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


